---Advertisement---

गुजरातमध्ये सिंहांच्या संख्येचा विक्रम, ६७४ वरून ८९१ वर पोहोचली संख्या, सौराष्ट्र प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये अधिवास

---Advertisement---

गुजरातमध्ये आशियाई सिंहांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. मागील पाच वर्षांत सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ वर पोहोचली आहे आणि त्यात २१७ ने वाढ झाली. याशिवाय त्यांचे अधिवास क्षेत्रदेखील गीर राष्ट्रीय उद्यानाबाहेर सौराष्ट्र प्रदेशातील ११ जिल्ह्यापर्यंत पोहोचत्याची माहिती नुकत्याच करण्यात आलेल्या प्राणी गणनेतून समोर आली.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, यापूर्वी जून २०२० मध्ये झालेल्या प्राणी गणनेत आशियाई सिंहांची संख्या ६७४ इतकी नोंदविण्यात आली. नवीन गणनेत १९६ नर, ३३० मादी, १४० प्रौढ आणि २२५ शावक सिंह आढळून आले. सिंहांची संख्या वाढत असल्याने त्यांचा अधिवास आता सौराष्ट्र प्रदेशापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी मोठे सिंहांचे अधिवास जुनागड आणि अमरेली जिल्ह्यातील गीर राष्ट्रीय उद्यानापुरते मर्यादित होते.

परंतु आता त्यांचा अधिवास ११ जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. ज्यामध्ये जंगले तसेच किनारी आणि वनेत्तर क्षेत्रांचा समावेश आहे. गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यात ३८४ सिंह आढळले तर ५०७ सिंहांचा अधिवास अभयारण्याच्या हद्दीबाहेर होता. गीरच्या बाहेर ज्या भागात सिंह आढळले त्यात पानिया, मिटियाला, गिरनार आणि बर्डासारख्या अभयारण्याचा समावेश आहे. काही वन नसलेल्या भागात आणि किनारी भागात त्यांचा अधिवास आहे.

गीरच्या बाहेरही आढळले सिंह

गुजरात वन विभागाचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक जयपाल सिंह यांनी सांगितले की, १० ते १३ मे या काळात सिंहांची गणनी करण्यात आली. यात ११ जिल्ह्यांतील ५८ तालुक्यात ३५००० चौरस किलोमीटर क्षेत्रात सिंह आढळून आले. याचा अर्थ असा की आता गीरच्या बाहेर सिंहांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गणनेसाठा तीन हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

या ११ जिल्ह्यांत दिसतात सिंह

जुनागढ, गिर सोमनाथ, भावनगर, राजकोट, मोरबी, सुरेंद्रनगर, द्वारका, जामनगर, अमरेली, पोरबंदर, बोटाड या संरक्षित क्षेत्रात सिंह दिसले. गीरशिवाय पाणिया अभयारण्य, मिटियाला अभयारण्य, गिरनार अभयारण्य, बर्डा अभयारण्य येथेही सिंहाचा अधिवास आहे.

प्राणिगणनेतून समोर आलेली आकडेवारी

  • आढळलेले एकूण सिंह – ८९१
  • २०२० मध्ये सिंहांची संख्या – ६७४
  • पाच वर्षात झालेली वाढ – २१७
  • नर सिंहांची संख्या – १९६
  • सिंहिणीची संख्या – ३३०
  • प्रौढ सिंहांची संख्या – १४०
  • शावकांची संख्या – २२५
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment