जर तुम्हीही बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँकेने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) आणि रिव्ह्यूअर पदांसाठी भरती प्रकिया सुरु केली आहे.
या यापदांसाठी भरती
एसबीआई स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) – 05
ईआरएस रिव्यूअर – 30
दोन्ही पदांच्या भरतीसाठी अधिकृत सूचना बँकेच्या वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने २ एप्रिलपासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २२ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.
पात्रता
एसबीआय एससीओ ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारत किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसाय शाळांमधून एमबीए / एक्झिक्युटिव्ह एमबीए पदवी (०२ वर्षे) किमान ५५ टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे. तसेच १० वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यापैकी, BFSI/लीडरशिप/बिहेविअरल सायन्स इत्यादी किंवा कॉलेज/इन्स्टिट्यूटमध्ये डीन/विभागप्रमुख म्हणून ३ वर्षे काम केलेले असणे आवश्यक आहे.
SBI ERS रिव्ह्यूअर पदासाठी फक्त SBI/e-ABs निवृत्त उमेदवारच SMGS-IV/V ग्रेडमधून अर्ज करू शकतात. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेतून पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहिती देखील तपासू शकतात.
वयोमर्यादा
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी किमान वय २८ आणि कमाल वय ५५ निश्चित करण्यात आले आहे.
किती असेल पगार ?
SBI रिव्ह्यूअर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांचा पगार ५०,००० ते ६५,००० पर्यंत असेल.
अशी होईल निवड
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखत १०० गुणांची असेल. त्यापैकी पात्रता गुण बँकेद्वारे निश्चित केले जातील.
या दोन्ही भरती कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत. दोन्ही भरतींशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.