पुणे महानगरपालिकेत 320 पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज

तरुण भारत लाईव्ह ।११ मार्च २०२३। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांसाठी आज म्हणजे 8 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झालीय. लक्ष्यात असू द्या Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  28 मार्च 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08
शैक्षणिक पात्रता : 
01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी. 02) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

2) वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी- 20
शैक्षणिक पात्रता : 
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.) 02) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

3) उपसंचालक – 01शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण 02) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

4) पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – 02
शैक्षणिक पात्रता 
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक- 20
शैक्षणिक पात्रता :
 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. 02) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

6) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – 40
शैक्षणिक पात्रता :
 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. 02) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

7) कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका. 02) अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

8) वाहन निरीक्षक – 03शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण. 03) आर. टी. ओ. जड वाहन परवाना. 04) मोटार वाहन कायदा विषयी माहिती. 05) पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.