सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे.राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वाहतूक महामंडळ लिमिटेड (एनसीआरटीसी) ने विविध रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
या भरतीअंतर्गत एकूण ७२ रिक्त जागा भरल्या जातील, ज्यासाठी इच्छुक उमेदवार २४ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी होणार भरती
१ .कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल)
२. प्रोग्राम असोसिएट
३. असिस्टंट एचआर,
४.असिस्टंट कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी आणि कनिष्ठ देखभालकर्ता (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल)
अशा एकूण ७२ पदांवर नियुक्त्या केल्या जातील.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डिप्लोमा, बीसीए, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स), बीबीए, बीबीएम, हॉटेल मॅनेजमेंट आणि आयटीआयमध्ये बॅचलर डिग्री (एनसीव्हीटी/एससीव्हीटी प्रमाणित) पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे, तथापि, राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागेल, तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे.
असा कराल अर्ज
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना विभागाच्या अधिकृत वेबसाइट ncrtc.inवर जाऊन करिअर विभागातील भरतीशी संबंधित अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन नोंदणी बटणावर क्लिक करावे लागेल आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.
नोंदणी पूर्ण केल्यानंतर, उर्वरित आवश्यक तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर अर्ज शुल्क लागू असेल तर ते ऑनलाइन जमा करावे लागेल आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंट आउट काढून ती जतन करावी लागेल.