---Advertisement---
जर तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हो, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRC) मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे जी २४ एप्रिल २०२५ या शेवटच्या तारखेपर्यंत सुरू राहील.
या पदांसाठी भरती
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (सिव्हिल) – ३५ पदे
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – १७ पदे
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (एस अँड टी) – ०३ पदे
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (रोलिंग स्टॉक) – ०४ पदे
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (आर्किटेक्चर) – ०८ पदे
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (डेटाबेस अॅडमिन) – ०१ पद
असिस्टंट मॅनेजर (खरेदी) – ०१ पद
असिस्टंट मॅनेजर (जनरल) – ०१ पद
पात्रता काय?
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित विषयासह BE/BTech पदवी असणे आवश्यक आहे.तसेच दोन वर्षांचा अनुभव देखील आवश्यक आहे. असिस्टंट टेक्निकल मॅनेजर आर्किटेक्चर पदासाठी आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवीमध्ये 4 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. असिस्टंट टेक्निकल मॅनेजर डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटरसाठी BE/BTech पदवी आवश्यक आहे.
पगार किती ?
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर पदासाठी 40000-140000 रुपये आणि असिस्टंट टेक्निकल मॅनेजर पदासाठी 50000-160000 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे.
वयोमर्यादा ?
ज्युनियर टेक्निकल मॅनेजर पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 20 ते 35 वर्षे असावे. असिस्टंट टेक्निकल मॅनेजरसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, उमेदवारांनी NHSRCL nhsrcl.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
यानंतर, करिअर विभागात जा आणि चालू ओपनिंग्जवर क्लिक करा.
नंतर नोंदणी लिंकवर जा आणि आवश्यक माहिती भरा आणि नोंदणी करा.
लॉगिन करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
अर्ज शुल्क भरा आणि फॉर्मची प्रिंटआउट ठेवा.