---Advertisement---
Govt Recruitment : प्रसार भारती इंडियन ब्रॉडकास्टींग कॉरिशन मुख्यालय, नवी दिल्ली (भारताचे सरकारी मालकीचे सार्वजनिक प्रसारक) देशभरातील दूरदर्शन टेलीव्हिजन नेटवर्क आणि ऑल इंडिया रेडिओ स्टेशन्समध्ये टेक्निकल इंटर्स पदांची करार पद्धतीने १ वर्षाच्या कालावधीकरिता भरती केली जात आहे.
यात विभागनिहाय रिक्त पदे खालील प्रमाणे आहे. पश्चिम विभागातील दूरदर्शन केंद्रांतील रिक्त पदे – मुंबई-६, भोपाळ – २, अहमदाबाद- ४, पणजी – ५, रायपूर – ४, एकूण – २१.
दक्षिण विभाग – ६३, पूर्व विभाग – ६५, पश्चिम विभाग – ६६, उत्तर विभाग ५२, उत्तर पूर्व विभाग ६३, नवी दिल्ली- १०१, एकूण रिक्त पदे – ४१०.
---Advertisement---
पश्चिम विभागातील प्रसार भारतीत संधी आकाशवाणी केंद्रे मुंबई ७, ओरस १, रत्नागिरी २, सांगली – २, परभणी २, पुणे २, -एचपीटी मालाड ३, एचपीटी पणजी ३, अहमदाबाद – २, भोपाळ ३, पणजी ४, रायपूर २, अंबिकापूर – २, जगदलपूर -२, भुज२, एकूण ३९ पदे.
पश्चिम विभागातील सीसीडब्ल्यू केंद्र – मुंबई – एकूण ३ पदे (सिव्हील – २, इलेक्ट्रकिल -१), पुणे – एकूण ३ पदे (सिव्हील -२, इलेक्ट्रकिल – १).
पात्रता – इलेक्ट्रकिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन /सिव्हील/आयटी/कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी २०२४-२५ मध्ये किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत असलेले उमेदवार संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेवून अर्ज करू शकतात.
जाणून घ्या वयोमर्यदा
वयोमर्यादा – (दि. ३ जुलै २०२५ रोजी) ३० वर्षे पूर्ण नसावीत. एकत्रित स्टायपेंड -रु. २५,०००/- दरमहा. शंकासमाधानासाठी avedanhelpdesk@gmail. com या ई-मेलवर screenshot of error सह मेल करावा. ऑनलाइन अर्ज http://avedan. prasarbharati. org/ या संकेतस्थळावर ३ जुलै २०२५ पर्यंत करावेत.