जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव येथी सर्व पदाधिकारी, सभासद आणि सर्व कर्मचारी यांनी संपूर्ण परिवारासह मतदान करण्याची शपथ घेतली. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी मतदान जनजागृतीबाबत आवाहन केले. ते म्हणाले कि, मतदान करणे आपले कर्तव्यच नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे. जनसेवेसाठी मिळालेल्या आपल्या या अधिकाराचा आपण वापर केलाच पाहिजे. आपले एक मत लोकशाहीला बळकट करण्याचा मुलभूत पाया आहे म्हणून १३ मे रोजी होणाऱ्या सार्वजनिक निवणुकीत आपण मतदान नक्की करा. याप्रसंगी रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी उपस्थित सर्वांना मतदानाची शपथ दिली. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, डॉ. राजेश सुरळकर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.