बिहार : बिहारमधील खडगिया येथे इंस्टाग्राम वर रील्स बनवत असताना रेल्वेची धडक बसल्यामुळे 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील खडगिया येथे रेल्वे ब्रिजवर जाऊन रिल्स बनविणे तिन मुलांच्या जीवावर बेतले. रेल्वे ची जोरदार धडक बसल्यामुळे यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मिडिया प्लेटफ्रॉम आहे. अनेक जण इंस्टाग्राम या सोशल मीडिया वर नेहमी ऍक्टिव्ह असतात. इंस्टाग्राम मधील रील्स हे फिचर हे अनेकांचे आवडते फीचर आहे. रील्स वर तुम्ही ९० सेकंदाचा व्हिडिओ शेअर करू शकता .काही व्हिडीयोज प्रेरणात्मक किंवा मजेशीर असतात. अनेकांना रील्स बनवणे आवडते . पण रील्स बनवताना ते आपल्या अंगाशी तर येणार नाही ना याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. रील्स बनवत असताना खडगीया येथे रेल्वे पुलावर रील्स बनवत असताना रील्स बनवणं त्यांच्या जीवावर बेतलं. ही तीन मुले रेल्वे ब्रीजवर जाऊन रिल्स बनवत होती. दाट धुक्यात ही मुले रिल्स बनवत असताना समोरुन येणारी ट्रेन त्यांच्या दृष्टीक्षेपास आली नाही. त्यामुळे ट्रेनची धडक बसून यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला.तिसऱ्याने बाजूला उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले तो जखमी झाला असून त्याच्या आता उपचार सुरु आहेत.
अमन , सोनू , नितीश असे या तिघांची नावे आहेत. हे तिघे धामरा घाट स्टेशनजवळून कात्यायनी मंदिरात निघाले होते. दरम्यान, ही घटना घडली, जाताना त्यांनी मधला मार्ग निवडला याच वेळी सोनू रिल्स बनवत होता. पोलिसांनी या प्रकरणात अपघाताची नोंद केली आहे. तुम्ही जर रील्स बनवत असाल तर ज्याठिकाणी तुम्ही रील्स बनवत आहात तो परिसर तुमच्यासाठी सुरक्षित तर आहे ना? याची रील्स बनवणाऱ्याने खबरदारी घेतली पाहिजे .