---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्युज : राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीसाठीच्या माती सर्वेक्षण करण्यात येत असून काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असताना रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
२४ एप्रिल २०२३ पासून राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीसाठी ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होणार होते. त्यामुळे सर्व भागात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटर परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.यासोबतच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 22 एप्रिल ते 3० किंवा या कालावधीपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हाळे, खालचीवाडी गोवळ राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, . येथील बंदोबस्तासाठी पोलिसांची गाडी निघाली असता कशेळी बांध येथे पोलिसांची व्हॅन पलटी झाली. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले असून जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.