---Advertisement---

Nandurbar News : सर्पदंश झालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांची कसरत, बांबूची झोळी करीत पार केली नदी

---Advertisement---

नंदुरबार : जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या पाड्यातील एकाला सापाने चावा घेतल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी करत त्याला उपचारासाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत वेळीच उपलब्ध करुन दिली आहे.

सापाने चावा घेतलेल्या रुग्ण हा गंभीर अवस्थेत होता. त्याला नदी पार करुन घेऊन जातांना त्याच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली. याचवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार हे गावाच्या दौऱ्यावर आले होते. नातेवाईंकांची ही कसरत त्यांच्या समोरच सुरु असल्याने त्यांनी परिस्थितीची गंभीरता प्रत्यक्ष दिसून आली. त्यांनी ही बाब लक्षात घेऊन या रुग्णाला तात्काळ उपचार मिळावेत याकरिता प्रयत्न केले.

---Advertisement---

त्यांनी लागलीच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णाला आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्यात. अशी बिकट परिस्थिती फक्त केलखाडीच नव्हे तर अक्कलकुवा, धडगाव, शहादा आदी परिसरातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये देखिल पाहावयास मिळते. या भागात दळणवळणाच्या साधनांचा वाणवा आहे. पावसाळ्यात तर ही समस्या अधिक बिकट होते. पूल नसल्याने शाळकरी मुले, रुग्ण, गर्भवती महिला यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
शासनाकडून साकव बांधण्याचा निर्णयाची अमलबजावणी व्हावी

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाडा दरम्यान केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध होणार आहे. हा अवर्गीकृत रस्ता ठाण्याविहिर पाड्यापासून केलखाडी पाड्यापर्यंत 5 किमीचा राहणार आहे. या मार्गामध्ये केलखाडी पाड्याजवळ केलखाडी नदी येते.


पाड्यापासून 1 किमीवर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी दररोज नदी ओलांडून शिक्षणासाठी जात असतात. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत होता. हे लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी 15 मीटर लांबीचा साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---