एआय-१७१ विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा जाहीर करा, अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांचे पंतप्रधानांना पत्र

---Advertisement---

 

अहमदाबाद : ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ (सीव्हीआर) आणि ब्लॅक बॉक्समधील डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे, अशी मागणी २६० जणांचा बळी घेणाऱ्या एअर इंडियाच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर दहा महिन्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

१२ जून २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे एआय-१७१ हे बोईंग ७८७-८ विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह संकुलावर कोसळले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. यात विमानातील २४२ पैकी २४१ आणि जमिनीवरील १९ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या.

गुजरातमधील जवळपास ३० शोकाकुल कुटुंबांनी शनिवारी अहमदाबाद येथे भेट घेतली आणि पंतप्रधानांना पत्र लिहून, या दुर्घटनेमागील सत्य उलगडण्यासाठी सीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्समधील डेटा सार्वजनिक करण्याची विनंती केली. अपघाताचे कारण काय होते आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का, याबद्दलचे सत्य आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्राच्या प्रती विमान अपघात तपासणी ब्युरो आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पाठवण्यात आल्या. ब्लॅकबॉक्समधील माहिती सार्वजनिक करणे शक्य नसेल, तर किमान ती माहिती पीडितांच्या कुटुंबीयांसोबत खाजगीरीत्या सामायिक केली जावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---