---Advertisement---
जळगाव : महापालिकेच्या दवाखाना विभागाचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी त्यांच्या सहकारी महिला डॉक्टरच्या केलेल्या लैंगिक छळाबाबत नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चार दिवसांपूर्वी अहवाल तब्बल ५ महिन्यांनी आयुक्तांना सादर केला आहे. महापालिकेकडून निलंबित करण्यात आलेल्या डॉ. घोलप यांनी पीडित महिलेस विविध मार्गाने धमकावले होते. त्यामुळे या अहवालात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.
महापालिकेच्या दवाखाना विभागाचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी त्यांच्याच विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे गैर मागणी केली होती. महिलेने नकार दिल्यानंतर डॉ. घोलप यांच्याकडून महिलेला वेगवेगळ्या पध्दतीने त्रास दिला जात असल्यामुळे संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी सदर तक्रार मनपाच्या महिला तक्रार निवारण समितीकडे पाठवली होती.
आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
समितीच्या अध्यक्षा धनश्री शिंदे यांनी अहवाल आयुक्तांकडे दिल्यानंतर निर्णयाचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.









