मुंबई: पुढील महिन्याच्या सुरवातीला होणाऱ्या दोन महिन्याच्या पतधोरण आढावा बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँक सलग चौथ्यांदा व्याज दर जैसे थै ठेवण्याची शक्यता आहे, अमेरिकन फेडरलने आणखी काही काळ व्याज दर जास्त ठेवण्याचा घेतलेला निर्णय आणि महागाई दर जास्त असल्याने ही शक्यता असल्याचे सांगितले आहे. रिझर्व्ह बँकने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दर ६.५ टाक्यांवर वाढवला होता.