जळगाव जिल्ह्यात किती जातींच्या पक्षांचा रहिवास आहे, तुम्हाला माहितेय का?

जळगाव : निसर्गमित्र जळगाव ई-बर्ड इंडियातर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील सलग चार दिवस कॅम्पस बर्ड काउंट ‘सीबीसी’ आणि ग्रेट ब्याक यार्ड बर्ड काउंट ‘जीबीबीसी’ उपक्रम राबविला जातो. यावर्षी देखील १७ ते 20 फेब्रुवारीदरम्यान पक्षी निरीक्षण आणि पक्षी गणना हा उपक्रम जळगाव येथे चार ठिकाणी घेण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 31 जातींच्या 320 पक्षांची नोंद करण्यात आली आहे.

पक्षी गणना आणि कॅम्पस बर्ड काउंट उपक्रमामध्ये १७ रोजी कण्व आश्रम, कानळदा 40 जातीचे पक्षी व 235 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. 18 रोजी स्मृती उद्यान, मेहरूण येथे 25 जातीचे पक्षी व 105 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. 19 रोजी गार्बेज डेपो, शिवाजीनगर येथे 36 जातीचे पक्षी आणि 221 पक्ष्यांची नोंद झाली. 20 रोजी कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद येथे 32 जातीचे पक्षी, 135 पक्ष्यांची नोंद झाली.

द ग्रेट बैकयार्ड बर्ड काउंट उपक्रम कानळदा रोड, जळगाव, शंभू हिल्स,रायसोनी नगर, निमखेडी,गिरणा नदी, शिरसोली पी.बी. तलाव, पक्षी निरीक्षण केले. निसर्गमित्र जळगावतर्फे पुढील वर्षीही या उपक्रमाला असाच प्रतिसाद मिळेल,असा आशावाद पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी व्यक्त केला.

पक्षी गणना अशी
एखाद्या संस्थेचे आवार आणि पाणथळ, नदीकाठ, शेती-गवताळ भाग याशिवाय निवास स्थानाचे परस अंगण आसपासची अन्य खुली जागा अशा मिश्र ठिकाणी पक्षी निरीक्षण व पक्षी गणना करण्यात आली.

या पक्षांची नोंद
या पक्षी गणनेत कावळा,चिमणी,मैना,पोपट,कबुतर,बुलबुल या स्थानिक पक्ष्यांबरोबर गुलाबी मैना, दगडी गप्पीदास, आशियाई आणि लाल छातीचा माशीमार, काळा थिरथिरा, तुतार्‍या, धोबी, चक्रवाक अशा काही देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली.