---Advertisement---

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने बड्या नेत्याचा राजीनामा

by team
---Advertisement---

मुंबई : विधानपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा पुढे आलं आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी राजीनामा दिला आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसने सोमवारी एक परिपत्रक जारी करत डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीवर नाराज असलेल्या अब्दुल हाफिज यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

याआधी उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, आता काँग्रेस पक्षातीलच अब्दुल हाफीज यांनीदेखील सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment