---Advertisement---

Jalgaon Crime News : सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करून घेतला गळफास; कारण आलं समोर

---Advertisement---

जळगाव : धरणगाव-एरंडोल तालुक्यात एका सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय 22, रा. भोरखेडा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव, तर विठ्ठल सखाराम पाटील (वय 50) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वडिलांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी मुलाचा शोध घेतला असता, भोरखेडा गावाजवळील एका नाल्यात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेला आढळून आला. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला, मात्र तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता.

विठ्ठल पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलाच्या खूनाची कबुली दिली. त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे की, “माझा मुलगा दारू पिऊन वारंवार मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून त्याचा खून करून भोरखेडा गावाजवळील नाल्यात पुरले आहे.”

सेवानिवृत्त सैनिकाने केलेला हा टोकाचा निर्णय संपूर्ण जिल्ह्यासाठी धक्का देणारा ठरला आहे. वडिलांची आत्महत्या आणि मुलाचा खून या दुहेरी घटनांनी गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेमागील नेमका संबंध आणि पार्श्वभूमी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment