१५ वर्षवरील रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय रद्द करा ; वीर सावरकर रिक्षा युनियनची मागणी

जळगाव :   परिवहन विभागाने १५ वर्ष वरील रिक्षा स्क्रॅप करावी असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा  अशी मागणी वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे करण्यात आली आहे .  यासंदर्भातील निवेदन बुधवार ,  ७  रोजी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन सावंत यांना देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की,  परिवहन विभागाने १५ वर्ष वरील रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे.  अगोदरच आम्ही रिक्षा चालक जेमतेम कमवून आमचा उदरनिर्वाह करीत असतो.  त्यात  शासनाने १ १५  वर्षावरील रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेऊन आमची पुन्हा पुन्हा गळचेपी केली आहे.  तरी निर्णय हा आताच लादणे चुकीचे असून रिक्षा चालकांवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे . आमच्या तुटपुंज्या कमाईतून मुलांचे शिक्षण, आरोग्य, वयोवृध्द आई -वडील त्यात इतर खर्च एवढा भार आम्ही उचलत असतो.  त्यात नविन नियमांची अंमलबजावणी सुद्धा आमच्यावर असते. अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आता नविन रिक्षा घेणे आम्हाला परवडणारे नाही. तिचे हफ्ते आम्ही भरू शकत नाही. आपण नवीन धोरणे आखून आम्हा रिक्षा चालकांचा जगणे मुश्किल करत आहात. आम्ही  रिक्षा स्क्रॅपचा २० वर्ष कालावधी दिला होता आणि तोच पुढील प्रमाणे असावा.  आमचं वाहन जर फिटनेससाठी पात्र नसेल किंवा काही त्रुटी असतील तर आम्ही आपल्या कारवाईस पात्र आहेत. परंतु,  आपण  हा निर्णय तातडीने रद्द करावा  हीच आपणास  आम्हा सर्वांकडून विनंती करण्यात येते. निवेदन देतांना  वाल्मिक सपकाळे, भानुदास गायकवाड, शशिकांत जाधव, पोपट ढोबळे, सचिन भालेराव पाटील, तानाजी काशीद, बाळू भालेराव, रमेश ठाकूर, एकनाथ बरी, प्रभाकर माळी, कैलास विसपुते, पंकज गायकवाड आदी उपस्थित होते.