---Advertisement---

Rhea Chakraborty: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

by team
---Advertisement---

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आणि मुंबई पोलिस आणि सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली.

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये केलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण श्वास रोखणे असल्याचे म्हटले आहे. सुशांतचे वडील केके सिंग यांनी पाटणा येथे एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर त्यांच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआयने जवळपास ५ वर्षांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

सीबीआयने कोर्टात क्लोजर रिपोर्ट काल सादर केला. त्यानंतर कोर्टाने कोणतेही पुरावे न मिळाल्यामुळे रियाला क्लीन चीट देत या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आत्महत्येचा खटला म्हणून बंद करून, आता या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी सीबीआयच्या अहवालाचे आणि त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रियाच्या कुटूंबाला न्यायालयाच्या निर्णयानंतर मोठा दिला मिळाला आहे. रियाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट करत बॅकग्राऊंडला सॅटीस्फाईड हे गाणं आहे. मी समाधानी आहे अशी प्रतिक्रिया तिने गाण्याच्या माध्यमातून दिली आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment