Rickshaw Fitness Certificate : विलंबासाठी दररोज पन्नास रुपयांचा दंडास स्थगितीची मागणी

जळगाव : रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी दररोज पन्नास रुपये दंडास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भातील निवेदन परिवहन विभाग सचिव यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र पदाधिकारी तथा वीर सावरकर रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, १ जुलै रोजी देण्यात आले.

निवेदनात केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी, सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी.  त्या मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र उशिरासाठी जाचक होणार नाही इतपत रक्कम आकारावी. दररोज रुपये 50 चा दंड रद्द करावा, यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती सचिव ,परिवहन विभाग यांना करण्यात आली आहे. अन्यथा केंद्र सरकार विरुद्ध मोठे जनआंदोलन छेडण्याचाही इशारा संघटनेकडून देण्यात आला आहेे. यात देशभरातील सर्व रिक्षा युनियन, चालक-मालक संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना आदी सहभागी होणार आहेत. लोकप्रतिनिधींना स्थानिक पातळीवर अटकाव करून घेराव घालणार आहेत. सदर निवेदन हे केंद्र परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री महाराष्ट्र ,पालकामंत्री, खासदार,आमदार, जळगाव यांना देण्यात येणार आहे.

निवेदन देतांना स्थानिक संघटनाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यात भानुदास गायकवाड, कैलास विसपुते, वाल्मीक सपकाळे, शशिकांत किरण, किरण मराठे, अनिल शिंगटे, पोपट ढोबळे, गणेश शिंदे, भारत वाघ, सचिन चौधरी, संजय पाटील, अहिरराव, गणेश खैरनार, किशोर पाटील, मंगेश पाटील, प्रवीण पाटील, प्रकाश पाठक, विलास पाटील, सुनील चौधरी, सोमनाथ गायकवाड, गणेश शिंपी, दीपक जाधव, राजू भगवान, राजेश गोपाळ, भास्कर शिरसाळे, नथू सावळे, प्रवीण घुगे, लक्ष्मण सोनवणे, गजानन जाधव, किरण कोळी, हेमंत चौधरी, भगवान पाटील, सचिन पाटील, दिलीप पाटील, पंकज जाधव, सागर पाटील, हर्षल गायकवाड, योगेश धनगर, संजय सोनार ,रमेश निकम, नरेंद्र जाधव, राजेंद्र सोनवणे, हेमंत चौधरी, फकीरा मनोहर, मनोहर पाटील, धनराज चौधरी, एकनाथ बारी, रवी जाधव ,राजेंद्र जाधव, देवा तायडे, दीपक जोशी, तानाजी वशीत, आर. आर. दिलीप, मनोज वाघ अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.