---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिकू सिंग याला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने धमकी दिली व १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणामुळे क्रीडाविश्वात मोठी खळबळ उडाली. या धमक्या दाऊद इब्राहिमच्या टोळीने दिल्या होत्या.
फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान रिकूच्या प्रमोशनल टीमला टोळीकडून तीन धमकीचे संदेश मिळाले होते, अशी मुंबई गुन्हे शाखेची माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसिद्ध क्रिकेटपटू रिंकू सिंह याला एका अज्ञातनंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण डी-कंपनीचा गुंड असल्याचे सांगत, रिंकू सिंगकडे तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
ही रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली. यामुळे रिंकू सिंगने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी धमकी आलेल्या फोन नंबरचा माग काढला. या तपासात मोहम्मद दिलशाद नौशाद नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.