जम्मू काश्मीरच्या बैठकीत कलम ३७० हटवण्याविरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ

#image_title

जम्मू-काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरेंन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे पुलवामा येथील आमदार वाहिद पारा यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या विरोधात ठराव मांडला. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी केली. वाहिद पारा यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.

जम्मू-काश्मीर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर येथे झालेल्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला. ही बैठक समोवारी ४ नोव्हेंबर रोजी झाली होती. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निव़डणुकच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कलम ३७० आणि ३५ए हटवण्याच्या विरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे.

याचदरम्यान आता पुलवामा येथील पीडीपीचे आमदार वाहिद पारा यांनी हा प्रस्ताव आणला होता. विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यात आल्याचा प्रस्ताव संबंधित बैठकीत मांडण्यात आला आहे.

वाहिद पारा यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर भाजपच्या आमदारांनी त्याला विरोध केला. भाजपच्या सर्व 28 आमदारांनी या प्रस्तावाला विरोध केला. भाजप आमदार श्याम लाल शर्मा यांनी आरोप केलाय की, पारा यांनी विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यासाठी त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी सदस्यांना त्यांच्या जागेवर जाण्याची विनंती केली. कारण यानंतर विधानसभेत एकच गदारोळ सुरु होता. ते म्हणाले की, हा प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आलेला नाही, तो आल्यावर त्याची चौकशी करू.