ऋतुराजचा पराक्रमी धडाका; पण..

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शुक्रवारी शेतकी खेळी केली. गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी करत महाराष्ट्राला चांगली धावसंख्या उभारून देण्याचा प्रयत्न केला तसेच विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शकते करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. पण ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला. सौराष्ट्रने यावेळी महाराष्ट्राला पाच विकेट्सने पराभूत केले.

महाराष्ट्राने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ऋतुराजने आपल्या शतकाच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ऋतुराजने १३१ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह १०८ धावा केल्या. या स्पर्धेतील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक आहे. याआधी त्याने क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध २२० धावा केल्या. त्यानंतर सेमीफायनलमध्ये आसामविरुद्ध १६८ धावांची खेळी केली. या हंगामात ऋतुराजने ५ सामन्यात २२०च्या सरासरीने ६६० धावा केल्या. अंतिम सामन्यात १०८ धावांची खेळी करत ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने रॉबिन उथप्पा आणि अंकित बावने यांना मागे टाकले. ऋतुराजच्या नावावर या स्पर्धेत १२ शतक झाली आहेत. उथप्पा आणइ बावने यांनी प्रत्येकी ११ शतक केली आहेत. ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर यावेळी महाराष्ट्राच्या संघाला ५० षटकांत ९ बाद २४८ अशी दमदार धावसंख्या उभारता आली.
महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवात चांगली झाली. कारण सौराष्ट्रला यावेळी चांगली सलामी मिळाली. शेल्डन जॅक्सन आणि हाव्हिक देसाई यांनी यावेळी १२५ धावांची सलामी दिली. त्यामुळे सौराष्ट्रला यावेळी विजयाचा पाया रचला आला. देसाईने यावेळी अर्धशतक साजरे केले, पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. त्याने ६७ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. देसाई बाद झाला तर जॅक्सनने यावेळी संघासाठी दमदार शतकी खेळी साकारली. जॅक्सनने यावेळी तुफानी फटेकबाजी करत महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्राने सलामीवीर देसाईला बाद केल्यावर सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी जॅक्सन हा एकमेव अडथळा महाराष्ट्राच्या विजयाच्या मार्गात उभा होता. जॅक्सन अखेरपर्यंत उभा राहीला आणि त्यामुळेच सौराष्ट्रला विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद पटकावता आले.