तरुण भारत लाईव्ह ।१४ मार्च २०२३। यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी ९३१ कोटींची तरतूद करण्यात आली असून सर्वत्र रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. जिल्ह्यातील रस्ते व त्यावरील पुलांच्या ४४५ रस्ते विकासासाठी एकूण तब्बल ९३१ कोटी ४८ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
जळगाव व धरणगाव तालुक्यातील १७ रस्ते व मोऱ्यांच्या बांधकामासाठी १२ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की रस्त्यांच्या विकासामुळे जनतेचा प्रवास सुखकर होईल
जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या एकूण ४४५ रस्ते विकासासाठी एकूण तब्बल ९३१ कोटी ४८ लक्ष निधी मंजूर करण्यात आले आहे. यात भुसावळ विभागासाठी २०६ रस्त्यांची कामे त्याकरिता ३६५ कोटी ७७ लक्ष ५० हजार, जळगाव उत्तर विभागासाठी ९६ रस्त्यांची कामे त्याकरिता ३१५ कोटी ३४ लक्ष ५० हजार, जळगाव क्र. २ विभागासाठी ७१ रस्त्यांची कामे त्याकरिता ११६ कोटी ४६ लाख, तर अमळनेर विभागाकरिता ७२ कामांसाठी १३३ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
जळगाव ग्रामीण मततदारसंघातही अनेकविध विकासकामांना प्रस्तावित करण्यात आल्याने जनतेला दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील रस्ते व त्यावरील पुलांच्या ४४५ रस्ते विकासासाठी एकूण तब्बल ९३१ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आले आहेत