Rozgar Mela 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, 23 रोजी ‘रोजगार मेळा’ योजनेअंतर्गत सुमारे 71,000 तरुणांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या कार्यक्रमात पीएम मोदी यांनी भारतातील तरुणांच्या कौशल्यांचा उपयोग करण्यावर भर दिला.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने गेल्या दीड वर्षांत सुमारे 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत, जे एक विक्रमी कामगिरी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सातत्याने कार्यरत आहे.
पीएम मोदी यांनी यावेळी म्हटले की, रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या 10 वर्षांपासून विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू असून, आजच्या 71,000 नियुक्तीपत्रांमुळे या उपक्रमाला नवी चालना मिळाली आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि यांचा प्रभावी उपयोग करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.