RPF अंतर्गत तब्बल 2250 जागांवर जम्बो भरती ; 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) आणि कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे RRB एकूण 2250 पदांसाठी उमेदवारांची निवड करेल. ज्यामध्ये हवालदाराच्या 2000 आणि उपनिरीक्षकाच्या 250 पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करू नये. अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता
रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.

वय श्रेणी
RPF मध्ये कॉन्स्टेबलच्या पदांसाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे तर कमाल २५ वर्षे ठेवण्यात आले आहे. तर उपनिरीक्षक पदासाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी, प्रथम रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकृत वेबसाइट https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ वर जा. त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी केल्यानंतर फॉर्म पूर्णपणे भरा. यानंतर, फी भरा आणि सबमिट करा. शेवटी फॉर्मची प्रिंटआउट घ्या. ज्याचा भविष्यात भरतीशी संबंधित कामासाठी उपयोग होऊ शकतो.