---Advertisement---
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड मार्फत आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण ३१२ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.
‘या’ पदांसाठी भरती?
या भरती मोहिमेत विविध पदांचा समावेश असून त्यामध्ये पुढील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे
- ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर – २०२ जागा
- चीफ लॉ असिस्टंट – २२ जागा
- पब्लिक प्रोसिक्यूटर – ७ जागा
- सीनियर पब्लिक इन्स्पेक्टर – १५ जागा
- स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर – २४ जागा
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. उमेदवारांचे वय साधारणतः ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
इतका पगार मिळणार?
रेल्वेमधील या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे.
- ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर व समकक्ष पदांसाठी – दरमहा ३५,४०० रुपये
- चीफ लॉ असिस्टंटसारख्या उच्च पदांसाठी – दरमहा ४४,९०० रुपये
याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच इतर शासकीय सुविधा देखील मिळणार आहेत.
इच्छुकांनी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.









