तरुण भारत लाईव्ह । १७ जानेवारी २०२३। गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर राजमौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने नवा पुरस्कार पटकवला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचा समीक्षकांचा चॉईस पुरस्कार मिळाल्याचे वृत्त आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांपासून चाहत्यांच्या आनंदाला थारा नाही. खुद्द क्रिटिकस चॉईस अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून हि माहिती सर्वांसोबत शेयर करण्यात आली आहे. एस एस. राजमौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’ प्रदर्शित झाल्यापासून नवीन रेकॉर्ड रचत आहे.
या चित्रपटाने जे केले, ते आजवर कवचितच कोणत्याही चित्रपटाने केले असेल. ‘आरआरआर’ ने जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. जगात फक्त या चित्रपटाचीच चर्चा होत आहे. या दक्षिणात्य चित्रपटाने पुन्हा भारताचे नाव जागतिक व्यासपीठावर उंचावले आहे.
इतकेच नाही तर, क्रिटिसिस चॉईस अवॉर्डच्या ट्विटर हँडलवर राजमौली यांचा एक व्हिडियोही शेयर करण्यात आला आहे. व्हिडियो मध्ये दिगदर्शक हातात ट्रॉफी घेऊन दिसत आहे. राजमौली यांच्या चेहऱ्यावर हास्य स्पष्टपणे पहायला मिळत आहे.