Multibagger Stock: 1 लाख रुपयांचे झाले 91 लाख, तुमच्याही पोर्टफोलिओत आहे का ‘हा’ मल्टीबॅगर स्टॉक्स?

Piccadily Share : शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखीम  मानले जाते, पण बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा करून देतात. अशा चांगल्या शेअर्सच्या यादीत मद्य उत्पादक कंपनी पिकाडिली अ‍ॅग्रोचा शेअर देखील समाविष्ट आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये जर तुम्ही  फक्त एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आतापर्यंत त्याचे  91 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. 

8 रुपयांचा शेअर ₹788

१९९४ मध्ये सुरू झालेली पिकाडिली अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे. जी मद्य बनवते आणि तिची सिंगल माल्ट व्हिस्की इंद्रीने अनेक पदके जिंकली आहेत. पाच वर्षांपूर्वी २४ जानेवारी २०२० रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त ८.५८ रुपये होती, जी आज ७८० रुपये एवढी आहे.

हेही वाचा : बापरे ! बांगलादेशी महिलेनेही  घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

जर आपण त्यानुसार परतावा मोजला तर तो ९०९१.१४ टक्के पर्यंतचा परतवा या शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.  म्हणजे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने २४ जानेवारी २०२० रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ते आतापर्यंत ठेवले असते, तर त्याची रक्कम ९१ लाख ९१ हजार रुपये झाली असती.

दोनदा सर्वोत्तम व्हिस्कीचा पुरस्कार

खरं तर, इंद्री सिंगल माल्ट इंडियन व्हिस्कीला दोनदा जगातील सर्वोत्तम व्हिस्कीचा किताब मिळाला आहे, प्रथम २०२३ मध्ये आणि नंतर गेल्या वर्षी २०२४ मध्ये, इंद्रीला ‘व्हिस्की ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला आहे.