भाजपचे ज्येष्ठ नेते प्रबल प्रताव जुदेव यांच्या नेतृत्वाखाली या आदिवासी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘घरवापसी’ अभियान राबवले जात आहे. या अभियान अंतर्गत ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २०० आदिवासींनी छत्तीसगडमध्ये पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. हे आदिवासी पहाडी कोरवा समुदायातील आहेत.
हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करत असलेल्या आदिवासींचे पाय गंगाजल धुण्यात आले. वैदिक मंत्राच्या उच्चारात घरवापसी कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम भाजपचे ज्येष्ठ नेते प्रबल प्रताव जुदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. जुदेव येथील राजघरण्याचे वंशज आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या आदिवासी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘घरवापसी’ अभियान राबवले जाते. “आदिवासी भागात बेकायदेशीर धर्मांतर केले जाते, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” असे जुदेव म्हणाले.