हरिद्वार : उत्तरकाशीतील आपत्तीग्रस्त गावांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी पोहचले आहेत. त्यांनी बाधित कुटुंबांना रेशन किट वाटले आणि नुकसानीचा आढावा घेतला. इतर सामाजिक संस्था देखील मदतीसाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन बैठक शांतीकुंजचे प्रमुख शैल दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत मदत कार्याची रूपरेषा तयार करण्यात आली. दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, गायत्री परिवार उत्तरकाशीतील या आपत्तीमुळे दुःखी आहे. पीडितांना शांती आणि शोकग्रस्त कुटुंबांना धीर मिळावा यासाठी त्यांनी माँ गायत्रीला प्रार्थना केली. या संकटाच्या काळात शांतीकुंज बाधित कुटुंबांसोबत उभा आहे.
---Advertisement---
आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रशिक्षित सदस्य इंद्रजित सिंग यांच्या नेतृत्वाखालील मदत पथक मदतकार्यासाठी उत्तरकाशीला रवाना झाले. शांतीकुंजचे वरिष्ठ कार्यकर्त्यांचा देखील त्यात समावेश आहे. शांतीकुंजचे प्रशासक योगेंद्र गिरी म्हणाले की, मदत पथक स्थानिक प्रशासन आणि बाधित कुटुंबांच्या संपर्कात आहे. पीडितांच्या गरजा ओळखून त्यांना तात्काळ मदत देण्याची योजना या पथकाने आखली आहे. तात्पुरते कॅन्टीन, कपडे, भांडी, कोरडे राशन आणि नाश्ता यासारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप केले जाईल.
यापूर्वीही शांतीकुंजच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने केदारनाथ, पिथोरागड, गुजरात भूकंप आणि नेपाळ भूकंप यासारख्या गंभीर आपत्तींमध्ये सक्रियपणे सेवा दिली आहे. तसेच बाबा रामदेव यांनी पतंजली संस्थानकडून मदत साहित्य घेऊन जाणारी चार वाहने उत्तरकाशीला पाठवली आहेत, जिथे जिल्हा प्रशासनामार्फत त्यांचे वाटप केले जात आहे.
मदत कार्याची जबाबदारी घेतली संघ स्वयंसेवकांनी
आरएसएस स्वयंसेवक नेहमीच पीडितांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. ते मदत करण्यासाठी धाराली येथेही पोहोचले आहेत. त्यांनी आपत्तीग्रस्त भागात दोन आठवड्यांच्या रेशन किटचे वाटप केले. रेडुल आणि कलगडी गावांमध्ये स्वयंसेवक सेवाकार्य करतानाही दिसले. हर्षिल, भटवाडी, गंगानानी आणि धारालीशी जोडलेल्या ग्रामीण भागातील गरजूंच्या घरी रेशन किट पोहोचवण्यात आले आणि येथे झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करून अहवाल तयार करण्यात आला.