---Advertisement---
RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची बैठक यावर्षी ४, ५ आणि ६ जुलै रोजी राजधानी दिल्लीतील ‘केशवकुंज’ संघ कार्यालयात होईल. देशभरातील सर्व प्रांत प्रचारक, सह प्रांत प्रचारक आणि क्षेत्र प्रचारक तसेच सह क्षेत्र प्रचारक बैठकीला उपस्थित राहतील. संघ रचनेत एकूण ११ क्षेत्र आणि ४६ प्रांत समाविष्ट आहेत.
या बैठकीत संघाशी संबंधित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्रीही सहभागी होईल. नुकत्याच पार पडलेल्या संघ प्रशिक्षण वर्गांचे वृत्तांत आणि समीक्षण, आगामी शताब्दी वर्षाच्या निर्धारित कार्यक्रमांच्या योजनांची अंमलबजावणी, माननीय सरसंघचालकांच्या २०२५-२६ मधील प्रवास योजना आदी विषयांवर बैठकीत चर्चा केली जाईल.
संघ शताब्दी वर्षाचे कार्यक्रम आगामी विजयादशमी अर्थात् २ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होऊन पुढील वर्षी विजयादशमीपर्यंत चालतील. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये यांच्यासह सर्व अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख, सह प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य बैठकीत सहभागी होतील. बैठकीसाठी सरसंघचालकांचे २८ जून रोजी दिल्लीत आगमन होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.









