आरटीओ तपासणी नाके बंद होणार, आमदार एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याची फलनिष्पत्ती

---Advertisement---

 

मुक्ताईनगर : राज्यातील अनेक सीमावती भागात वाहनधारकांची आर्थिक लूट व भ्रष्ट्राचाराला खतपणी घालणारे आरटीओचे सीमा तपासणी नाके आगामी काळात लवकरच बंद करण्यात येणार आहेत. विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात केलेला पत्रव्यवहार तसेच विधिमंडळात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याची शासनाने गंभीर दखल घेत आरटीओ सीमा तपासणी
नाक्यांवरील कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली असल्याचे आमदार खडसे यांनी म्हटले आहे.

आमदार खडसे यांनी आरटीओ सीमा तपासणी नाक्यांवरील ‘कार्ड सिस्टीम’ आणि कंत्राटदाराकडून होणारी अवैध वसुली पुरावे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच नाके बंद करण्याच्या प्रक्रियेत खोडा घालणारे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधातही लेखी पत्राद्वारे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार खरमाटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची नस्ती १२ ऑगस्ट २०२५ रोजीच गृह विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यानुसार, शासनाने संबंधित सेवापुरवठादार कंपनीला २७ जून २०२५ रोजी कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली असून यामुळे कंत्राटदाराला द्यावी लागणारी भरपाई आणि कायदेशीर बाबींचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. यात मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेनंतर आरटीओ सीमा तपासणी नाके कायमचे बंद करण्यात येणार असल्याने आमदार खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---