बीड । जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज मोर्चा निघाला, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
https://x.com/Rupalispeak/status/1872958452940820941/photo/1
हा स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी संवाद साधल्याचे दिसत आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी हा स्क्रीनशॉट X (पूर्वी ट्विटर) या माध्यमातून शेअर केला असून कॅप्शनमध्ये विचारले आहे की, “जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? उत्तर द्या जितेंद्र भाऊ आव्हाड.”
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर राजकीय चर्चांना उधाण आले असून, संबंधित स्क्रीनशॉटची सत्यता आणि यातून पुढे काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.