स्वादिष्ट साबुदाणा वडा रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण असलेल्या साबुदाण्याचे पदार्थ उपवासा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, कारण यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. साबुदाणा वडा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
३ कप उकडलेले बटाटा, आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या, १ चमचे कोथिंबीर आवश्यकतेनुसार, १.२ चमचे सैंधव मीठ, १०० ग्रॅम साबुदाणा, २ कप नारळाचे तेल, आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचे कुट, १.४ चमचे ब्लॅक पेपर

कृती 
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये साबुदाणे घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. आता २ तासांसाठी साबुदाणे भिजत ठेवा. पुढे, उकडलेले बटाटे बारीक किसून घ्या. हवे असल्यास तुम्ही बटाटे मॅशदेखील करु शकता. आता एका बाऊलमध्ये किसलेल्या किंवा मॅश केलेल्या बटाट्यांसोबत साबुदाणा, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, २ ते ३ बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा मिरपूड, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचं कुट, चवीनुसार सैंधव मीठ घ्या आणि सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा. हाताला थोडं तेल लावून मिश्रणाला वड्यांचा आकार द्या आणि सेट व्हायला ५ मिनिटे ते फ्रीजमध्ये ठेवा. एका पॅनमध्ये तेल गरम करुन वडे गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्या. आणि सर्व्ह करा साबुदाणा वडा.