मुंबई : सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील डॉन ब्रॅडमन याच्यानंतर विश्व स्तरावरील सर्वोत्तम असा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या शिरपेचात आता आणखी एक मोठा सन्मान खोवला गेला आहे. हा सन्मान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) करण्यात आला आहे. सुनील गावस्कर नंतर हा सन्मान मिळविणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. दुसराच खेळाडू आहे.
बीसीसीआयचे मुबई येथे मुख्यालय आहे. या मुख्यालयात आता एका बोर्ड रुमला सचिनचे नाव देण्यात आले आहे. याचे उदघाटन हे सचिनच्याच हस्ते करण्यात आले. या बोर्ड रूमच्या नाव देखील सचिनच्या क्रिकेट कारकिर्दला शोभेल असेच ठेवण्यात आले आहे. या बोर्ड रूमला सचिन तेंडुलकर याच्या नावातील अद्याक्षरांसोबतच त्याच्या शतकांची संख्या म्हणजेच ‘SRT100 असे वैशिट्यपूर्ण नाव देण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी सुनील गावसकर, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्लांसह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी बीसीसीआयच्या मुख्यालयात सुनील गावसकरांचे नावही एका बोर्डरुमला देण्यात आले आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर या उद्घाटन सोहळ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. याप्रसंगी सचिन म्हणाला, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या बरोबर समोर एक छोटी खोली होती. जेव्हा १९८९ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला, तेव्हा तिथे बीसीसीायचे कार्यालय होते. तेव्हापासून आत्तापर्यंत खूप बदल झाले आहेत. सचिनने यावेळी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या २००७ वनडे वर्ल्ड कपची आठवणीला उजाळा दिला. त्यावेळी भारताला साखळी फेरीतूनच बाहेर व्हावे लागले होते. तसेच त्याने सांगितले की या रुममध्ये ठेवण्यात असलेल्या ट्रॉफी या रूमला खास बनवीत आहे. , ‘याला आखणी विशेष येथे असलेल्या ट्रॉफी बनवतात. या ट्रॉफी म्हणजे बीसीसीआय पदाधिकारी आणि खेळाडूंनी काय योजना आखल्यात आणि अंमलात आणण्यासाठी काय केले आहे, त्याचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे हे अमुल्य क्षण आहेत. असे क्षण आहेत ज्यावेळी संपूर्ण देश एकत्र येतो आणि उत्सव साजरा करतो.’ तो पुढे म्हणाला, ‘त्यामुळे २००७ मधअये जेव्हा आम्ही वेस्ट इंडिजवरून नाराज होईन परत आलो, तेव्हा माझ्या डोक्यात अनेक विचार होते. मी पुढे खेळू की नको, याचा विचार करत होतो. मला लक्षात आहे मी माझ्या भावाशी याबाबत बोललो, तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला, २०११ मध्ये वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि मुंबईत अंतिम सामना होईल. तू कल्पना कर की ही ट्रॉफी घेऊन तू व्हिक्टरी लॅप घेशील. त्यावेळी माझा प्रवास पुन्हा सुरू झाला.’