चाळीसगाव : रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या प्रेरणेने भगवा घेऊन आम्ही शिवसैनिक गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहोत. तालुक्यातील जनता लहान लहान समस्यांनी त्रस्त आहे. उदासीन लोकप्रतिनिधी आणि निगरगट्ट महायुती सरकार या जात्यात जनता भरडली जात आहे. या सर्व जनतेला घेऊन शिवसेना लवकरच मोठे आंदोलन उभारणार असल्याचे शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे.
सोमवारी गोरखपूर येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्रबापू पाटील, तालुका प्रमुख रमेशआबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव नाना खलाणे, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील हिंगोणेकर, तालुका संघटक सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते संदीप घोरपडे, तालुका प्रमुख सविता कुमावत, पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, पंस सदस्य रवी चौधरी,उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, महेंद्र जैस्वाल, भटक्या विमुक्त सेना जिल्हाप्रमुख मारोती काळे, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख संजय पाटील, बारा बलुतेदार जिल्हा प्रमुख मुकेश गोसावी, ओबीसी जिल्हा प्रमुख संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पप्पू राजपूत, युवा सेना क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, तालुका उपप्रमुख नाना शिंदे, माजी पंचायत समिती दिलीप पाटील, अनुसूचित जाती सेना शहर प्रमुख सोनू आहिरे, अविनाश पाटील, उपसरपंच आण्णा राठोड, रवी राजपुत, कांताबाई राठोड, सुलताना खान, लतिफ दादा, शेषराव चव्हाण, चेतन वाघ, अमित सुराणा, साहेबराव राठोड, प्रवीण पाटील, किशोर पवार, दिपक एरंडे, तुषार भावसार, सौरभ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमवारी गोरखपुर (पिंपरखेड तांडा),32 नंबर तांडा,वलठाण तांडा,वलठाण गाव,पाटणा,चंडिकावाडी जूनपाणी, चत्रभुज तांडा,शिंदी,ओढरे, गणेशपूर या ठिकाणी शाखा उद्घाटन सोहळा पार पडला. सायंकाळी माजी खासदार पाटील यांनी गणेशपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गोरखपुर (पिंपरखेड तांडा) शाखा प्रमुख दिलिप चव्हाण, 32 नंबर तांडा शाखा प्रमुख दिनेश राठोड, वलठाण तांडा शाखा प्रमूख सोमनाथ जाधव, वलठाण गाव शाखा प्रमुख विक्की राठोड, पाटणा शाखा प्रमुख दिपक पाटील,चंडिकावाडी शाखा प्रमुख योगेश राठोड, जूनपाणी शाखा प्रमुख अंकुश राठोड, चत्रभुज तांडा शाखा प्रमुख सोमनाथ राठोड, शिंदी शाखा प्रमुख हेमंत फटांगरे, ओढरे शाखा प्रमुख नवनाथ पवार, गणेशपूर शाखा प्रमुख त्र्यंबक जाधव यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते, जेष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.