जळगाव : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी मंगळवारी (२७ मे) रोजी साजरी करण्यात आली. जळगाव येथील साई इच्छा फाउंडेशनने नेहरू यांची पुण्यतिथी गरीब व कचरा वेचणाऱ्या मुलांसोबत साजरी केली. विशेषतः साई इच्छा फाउंडेशनने अनोखी पुण्यतिथी साजरी करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे मुलांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे कट्टर समर्थक मानले जातात. प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्यसेवा आणि संगोपनाचे वातावरण मिळायला हवे असे, त्यांचे मत होते. मंगळवारी (२७ मे) रोजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जळगाव येथील साई इच्छा फाउंडेशनने नेहरू यांची पुण्यतिथी गरीब व कचरा वेचणाऱ्या मुलांसोबत साजरी केली. विशेषतः साई इच्छा फाउंडेशनने अनोखी पुण्यतिथी साजरी करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मुलांनी अनुभवले नेहरूजींचे जीवनकार्य
यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. नेहरूजी यांचं मुलांवरील प्रेम, शिक्षणास दिलेले महत्त्व व त्यांनी देशासाठी दिलेले योगदान याबाबत, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व शिक्षण विषयक कार्यशाळा याबाबतीतही माहिती देण्यात आली.
साई इच्छा फाउंडेशन गरजू मुलांसाठी कार्यरत
गेल्या अनेक वर्षांपासून साई इच्छा फाउंडेशन दुर्लक्षित व गरजू मुलांना शिक्षण व आधार देण्याचे कार्य करीत आहे. महापुरुषांच्या स्मृतीला उजाळा देऊन, त्यांचे जीवनकार्य गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न असलयाचे साई इच्छा फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. कचरा गोळा करणारे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साई इच्छा फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली कासार-शिरापुरे, मीनाक्षी पाटील, संस्थेचे सदस्य विवेक शिरापुरे यांच्यासह दुर्लक्षित व गरजू मुले उपस्थित होते.
