नंदुरबार : शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. नितीन प्रकश छत्रिय वय-42 रा.चौधरी गल्ली, नंदुरबार असे संशयित अटक आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना शहरातील जळका बाजार परिसरात एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा / दोऱ्यांची विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संशयित आरोपी नितीन प्रकशछ त्रियवय-42रा.चौधरी गल्ली, नंदुरबार यास 3 हजार 120/- रुपये किमतीचे 06 नग MONOSKYNINJA नायलॉन मांजासह ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरुद्द शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.797/2022 भा.द.वि.कलम336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला जिव देखील गमवावा लागला आहे, असे अनेक उदाहरण आपण वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमांद्वारे बघत असतो. अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जिवितांस सरंक्षण करण्याची गरज आहे. अशा दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्षांचे सरंक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मकरसंक्रांती सण साजरा करण्यासाठी पतांगोत्सावाचा आनंद घेण्यासाठी डी.जे. व स्पिकर लावुन मोठ-मोठ्याने गाणे लावुन नृत्य करतांना आपण बघत असतो, परंतु सण साजरा करुन आपली संस्कृती टिकवत असतांना पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्व सामान्य नागरीकांचे एक कर्तव्य आहे. – पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक महेश माळी, पोलीस हवालदार सुनिल मोरे, पोलीस शिपाई श्रीकांत पाटील, शैलेंद्र माळी, राहुल पांढारकर, अफसर शहा यांच्या पथकाने ही कारवाई केली.