त्याच त्याच समस्या आणि तीच.. कारणे!…

तरुण भारत लाईव्ह । १४ मे २०२३। जळगाव जिल्ह्यातील हवामान हे विषम व कोरडे आहे. जिल्ह्यात सरासरी 75 ते 80 सेमी पाऊस पडतो मात्र गत काही काळातील अनुभव लक्षात घेता शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यात होत असल्याचे लक्षात येते. तालुका निहाय परिस्थितीवर बदलते काही भागात 100% पेक्षा जास्त तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो काही क्षेत्र हे आवर्षण प्रमाण म्हणून ओळखले जाते त्या भागात पाण्याची समस्या ही दरवर्षी असते जिल्ह्यात गिरणा, वाघूर, तापी या प्रमुख नद्या दरवर्षी पावसाळ्यात दुधडी भरून वाहत असतात प्रचंड पूर या नद्यांना येतो पण पाणी वाहून जाते याचे प्रमुख कारण म्हणजे सिंचन प्रकल्पांची अपूर्णता. जळगाव जिल्ह्यात आजही अनेक प्रमुख सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे. यात प्रामुख्याने तापी नदीवरील पाडळसरी प्रकल्प त्या अगोदर शेळगाव बॅरेज सहकारी पूर्णा नदीवरील काही प्रकल्प बोदवड उपसा सिंचन योजना यासह महत्त्वाकांक्षी मेगा रिचार्ज प्रकल्प गिरणेवरील सात बलून बंधारे यासाठी गिरणा वाचवा ची हाक दे खासदार उमेश पाटील यांनी पदयात्रा काढली होती.

असे एक ना अनेक प्रकल्प रखडले आहेत केवळ राज्य व केंद्रच्या निधी अभावी हे प्रकल्प अखंड असल्याचे लक्षात येते गावांना दर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावत जावे लागते या प्रामुख्याने बोदवड जामनेर तालुक्यासह अन्न काही भागाचा या समावेश आहे की कितीही पाऊस पडला तरी या भागात उन्हाळ्यात त्यांचाही तेथील नागरिकांच्या वाट्याला येतेस येते जिल्ह्याचा विचार करता गेल्या पावसाळ्यात एवढा प्रचंड पाऊस झाला की काही भागात खरीपाचे विक वाहून गेले अनेक दिवस पिके पाण्याखाली राहिल्याने अक्षरशः सोडून गेली त्यामुळे असे वाटत होते की यंदा पाणीटंचाईत नसेल पण अनेक जिल्ह्यात पण अनेक भागात ही सुखद परिस्थिती दुर्मिळ सध्या स्थितीत जळगाव जिल्ह्यातील सुमारे 15 गावांना काम करणे पाणीपुरवठा करावा लागत आहे त्यांचाही काळा टँकरने पाणीपुरवठा करणे म्हणजे ठेकेदाराला पोहोचणे होय प्रचंड खर्च यावर केला जात असतो. त्यांचाही काळात निधीची टंचाई नसते हे जाणून घेऊन शासकीय यंत्रणा व राजकीय कार्यकर्ते दबाव आणून टँकर सुरू करण्याचा हट्ट करतात. एखादी छोटी योजना होऊ शकेल एवढा खर्च त्यांचाही काळात होत असतो.

एप्रिल मे आणि जून चा काही काळ हा उन्हाचा चटका देणारा या तीन महिन्यांच्या जलसिंचन प्रकल्पांमधील पाण्याचे प्रचंड बाष्पीभवन होत असते. जळगाव जिल्ह्यात तापमान एवढे प्रचंड असते की सिंचन प्रकल्पाचे पाणी झपाट्याने याबरोबरच प्रकल्पांच्या परिसरातून होणारी पाण्याची चोरी ही मोठ्या प्रमाणात असते गत पावसाळ्यात गिरणा बागोर 100% भरले होते हातनूर हातनूर प्रकल्पाची परिस्थिती एवढी भयंकर असते की या प्रकल्पासाठी 35 ते 40 प्रकल्प भरतील एवढे पाणी नदीपात्रातून वाहून जात असते वाहणारे पाणी पाहून नागरिकांचे डोळे भरून येतात आनंद होतो पण तो काही काळापर्यंतच मर्यादित राहतो कारण या पाण्याचा उपयोग या जिल्ह्यातील नागरिकांना काहीही नसतो आणि मग पुन्हा उन्हाळा येतो की त्यांचा समस्या आणि तीच तीच कारणे अशी परिस्थिती निर्माण होते पकडलेले सिंचन प्रकल्प सर्वांसाठी वरदान ठरणारे आहेत त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात मग तो कोणताही पक्ष असो पकडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असा उल्लेख असतो मात्र निवडणूक झाल्यानंतर जाहीर जाहीरनाम्यातील आश्वासनांचा सर्वांना विसर पडतो धरणगाव शहराचा विचार करत आहे तालुक्याचे ठिकाण आहे पंधरा पंधरा दिवस येथे पाणी नसते भुसावळ हे देशात आहे प्रसिद्ध असलेले गाव येथे येथेही शहराच्या जवळून नदी वाहत असताना नागरिकांना पाहण्यासाठी वणवण भटकावे लागत असते या शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना गेल्या चार ते पाच वर्षापासून रखडलेली आहे ही योजना लवकर झाल्यास जंक्शन म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या या गावाची परिस्थिती पार्टी शकते मात्र येथेही इच्छाशक्तीचा अभाव दिसतो पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होईल आता तरी पाणी आडवा पाणी जिरवा सारखे प्रकल्प लोकसहभागातून हाती घेतले जाणे गरजेचे आहे