समृद्धी महामार्ग: परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय!

तरुण भारत लाईव्ह । २२ जानेवारी २०२२ । समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे. विशेष म्हणजे, या महामार्गावर अपघात होऊच नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.

40 दिवसात, 65 अपघात


नागपूर आणि मुंबई दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा सरळसोट महामार्ग आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या 40 दिवसात या महामार्गावर जवळपास 65 अपघात झाले. तर एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 23 अपघात झाले. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असं चित्र उभं राहिलं.

..आणि परिवहन विभाग रस्त्यावर उतरले


परंतु, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभाग हे अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन रस्त्यावर उतरले आहे. तसेच समवृद्धी महामार्गांवर अपघातांची संख्या बघता आणि त्याची कारणं बघता आता यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे, वाहन चालकांची जनजागृती करणे यावर परिवहन विभाग भर देत आहे.

जनजागृती करणे महत्वाचे


अनेक कारणांमुळे सध्या अपघातांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे आता परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांवर जनजागृती करणे टायर फुठून अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर टायर मध्ये नायट्रोजन भरण्याची व्यवस्था करणे. अशा अनेक उपाय योजना आता प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरून परिवहन विभागाचे अधिकारी करत आहेत.

महामार्गाच्या आजूबाजूला कुठेही हॉटेल्स किंवा ढाबा नसल्याने आता अनेक ठिकाणी अनधिकृत रित्या छोटे छोटे फूड स्टॉल आणि टपऱ्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला मोठे ट्रक्स आणि वाहने थांबताना दिसत आहे. यामुळे सुद्धा अपघात वाढले आहेत. त्यामुळे परिवहन विभाग पोलीस आणि एमएसआरडीसीने या अनाधिकृत स्टॉल्सवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक ठिकाणी अशा अनधिकृत फुल स्टॉलमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता भविष्यात आहे.