तृप्ती देवरूखकर या महिलेला मुलुंडमध्ये घर नाकारलं कारण ती मराठी आहे. म्हणून तसेच आता पंकजा मुंडे याना देखील असा अनुभव आल्याचे ते सांगत आहे. त्या बोलताना म्हणाल्या माझं सरकारी घर सोडून दुसरं घर घ्यायचं होता.
तेव्हा मला देखील असा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे पकंजा मुंडे यांच्या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले असून देशपांडे म्हणाले, पंकजा मुंडे यांनी उशिरा प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी त्यांना जो अनुभव आला तेव्हा त्यांनी सांगितलं असतं तर मनसैनिकांनी पंकजा मुंडे यांना तेव्हाच घर मिळवून दिलं असतं. ते पुढे असेही म्हणाले, आजही पंकजा मुंडे यांना विनंती आहे की, कुठल्या सोसायटीने घर नाकारलं हे त्यांनी सांगावं, त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम मनसैनिक करतील. पकंजा मुंडे एकट्या नाही. मराठी माणसासाठी महाराष्ट्र सैनिक कायम तत्पर असतील असा शब्दही त्यांनी दिला.