संदीप सुकदेवराव पवार यांना पीएच.डी. पदवी प्रदान

पाचोरा (प्रतिनिधी):- आव्हाणे येथील जि.प. मुलींची शाळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप सुकदेवराव पवार यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ,जळगांव या विदयापीठचे कुलगुरु डॉ.विजय माहेश्वरी यांच्या शुभहस्ते इतिहास या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ.संदीप पवार यांना पीएचडीसाठी मुळजी जेठा महाविदयालयाचे प्रा.डॉ.जे.व्ही.दुबे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. मुळजी जेठा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, प्रा.डॉ.उज्वला भिरुड, मुकताईनगर येथील श्रीमती. जी.जी.खडसे महाविदयालयाचे प्रा.डॉ.पी.एस.प्रेमसागर, शेंदूर्णी येथील आप्पासाहेब र.भा.गरुड महाविदयालयाचे प्रा.डॉ.प्रशांत देशमुख यांनी वेळोवेळी अचूक मार्गदर्शन केल्यामुळे गेल्या ६ वर्षापासून सुरू असलेल्या पीएच.डी. या पदवीचे यश संपादन करता आल्याचे मत डॉ.संदीप पवार यांनी व्यक्त केले. जळगांव जि.प. शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप, नरेंद्र चौधरी, विजय सरोदे, जळगांव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, खलील शेख, विजय पवार यांच्यासह शिक्षक मित्र परिवार, ग.स.सोसायटीचे विविध संचालक, शिक्षक संघटनांचे विविध पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे अनेक पदाधिकारी, जळगांव टिचर्स स्पोर्टस क्लब आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.