---Advertisement---
जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचे जळगावात आगमन झाले असून, जळगावचं नव्हे तर उत्तर महाराष्ट्र ‘मविआ’चे सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
---Advertisement---