Sanjay Raut: सरकारवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कालच समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे अपघातानंतर ठाकरे गट आक्रमक संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावात भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 20 ते 22 जण गंभीर जखमी झालेत. या वरती समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावात भीषण अपघात झाला.

या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 20 ते 22 जण गंभीर जखमी झालेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की,घाईघाईत हा महामार्ग बनवण्यात आला. भीषण अपघात झाले त्याची जबाबदारी कोणीही घेत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री हे फक्त श्रेय घ्यायला पुढे आले होते. आम्ही केलं म्हणून सांगत होते. आता त्या रस्त्यावरती लोकांचे जीव जात आहेत. त्याची जबाबदारी देखील तुम्हाला घ्यावी लागेल, असं संजय राऊत म्हणालेत.समृद्धी महामार्ग महामार्ग हा मुळात चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेला आहे. हा महामार्ग निर्माण करताना जनतेच्या सुरक्षापेक्षा ठेकेदारांचं हित जपलं गेलंय. त्यातून कोट्यवधींचा मलिदा या पलीकडे या समृद्धी महामार्गाकडे पाहिलं गेलं नाही.

समृद्धी महामार्ग बनवत असताना शेतकरी, लहान उद्योजक यांचं हित पहिलं गेलं नाही. लोकांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या गेल्या. फळबाग, रस्त्यावरील उद्योग उध्वस्त करण्यात आले. त्या लोकांचे हे शाप आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.ते पुढे बोलताना म्हणाले,समृद्धी महामार्ग अजून देखील सुधारणा करून लोकांचे प्राण वाचवता आले असते. ते त्यांनी पाहिले पाहिजे. इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठेही दिसत नाही. कुठे थांबा नाही. कुठे लोकांना विश्रांतीची जागा नाही. आम्ही मागेच सरकारवर सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही केली होती. रोज लोकांच्या हत्या होत आहेत. या सरकारी हत्या आहेत. आम्ही संबंधित मंत्र्यांवरती कारवाईची मागणी करतो आहोत. संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.