Sanjay Raut: मोदींच्या तिथीनुसार वाढदिवसाचा मुहूर्त साधायचा होता, म्हणून…

संजय राऊत :  २१ संप्टेंबर रोजी ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक राज्यसभेमध्ये  मंजूर झाले या नंतर देशभरातुन आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच नारी शक्तीला देखील वंदन केले जात आहे, यादरम्यान शिवसेना ( उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, लोकसभा स्पेशल सेशन म्हणून हवा तयार करण्यात आली होती, पण विशेष अधिवेशनात भोपळा पण फुटला नाही. महिला विधेयक आलं, पण ते कधीही आणता आलं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदू तिथीनुसार वाढदिवस होता त्यांना तो मुहूर्त साधायचा होता. जर महिलांना २०२४ साली आरक्षण द्यायचं नव्हतं. तर विशेष अधिवेशन बोलवलं कशाला? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.

2029 नंतर महिलांना हे आरक्षण मिळणार आहे. संसदेतील गॅलरीमध्ये दोन दिवसापासून RSS शी संबंधीत संस्थांमधील विद्यार्थी आणून मोदी जिंदाबाद आशा घोषणा द्यायला लावल्या यासाठी अधिवेशन बोलवलं? चंद्रायन वर या आधीही चर्चा देशभरात झाली आहे.मग या अधिवेशनात विशेष काय घडलं असा प्रश्नही संजय राऊत यांनी यावेळी केला.

नवीन संसद भवनात गोंधळाशिवाय काही नाही. सगळ्यांची इच्छा आहे परत आम्हाला जुन्या संसद भवनात जाऊ द्या. आतमध्ये गुदमरल्यासारखे होतंय… आतमध्ये हवा, पणी नाही. एखाद्या बँक्वेट हॉलमध्ये आल्यासारखं वाटतंय. एक ऐतिहासिक अशी वास्तू सोडून आपण फक्त कुणाच्या तरी हट्टापायी २० हजार कोटी रुपये खर्च करुन एक नवीन वास्तू बांधली. ती उपयुक्त नाही, हा पैशांचा अपव्यय आहे, असेही संजय  राऊत म्हणाले.