Maharashtra Cabinet Expansion : संजय सावकारे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion : : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी आज नागपूरमध्ये होणार आहे, जिथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शपथ घेतली जात आहे. या विस्तारात 39 नवीन मंत्री शपथ घेणार आहेत, त्यात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असतील.

भारतीय जनता पक्षाचे भुसावळ मतदार संघांचे आमदार संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  नागपूर येथे आज मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. भुसावळच्या शिरपेचात पुन्हा मंत्रिपदाचा तुरा रोवला गेला आहे. आमदार संजय सावकारे यांच्या रूपाने भुसावळला पुन्हा मंत्रिपदाचा मान मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार असताना, संजय सावकारे यांनी ११ वर्षांपूर्वी कृषी राज्यमंत्रीपदासह जळगाव जिल्हाचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला, यावेळी त्यांनी मंत्री असतानाच राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता.  भाजप पक्षातर्फे संजय सावकारे हे दोन वेळा आमदार राहिले असून, या निवडणूक ते चौथ्यांदा आमदार झाले आहे.  त्यामुळे यंदा पक्ष त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्दी बघत त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.