Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सध्या बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. त्यावर आज विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली आहे. आज 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. त्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम हे काल रात्रीच बीडमध्ये दाखल झालेले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
दरम्यान, या सुनावणीमधिलन महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक एक असलेल्या वाल्मिक कराडने स्वतःला निर्दोष म्हटलं आहे. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा अर्ज त्याने कोर्टाला सादर केला आहे. सुनावणी पार पडल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला तेंव्हा हि माहिती दिली.
निकम पुढे म्हणाले की, वाल्मिक कराडने एक अर्ज दाखल केला असून स्वतः निर्दोष म्हटलं आहे. ”या खटल्यातून मला मुक्त करावे, कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खून किंवा खंडणीमध्ये मी नाही.” असा अर्ज कराडने कोर्टात दाखल केल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
आरोपी वाल्मिक कराड याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर रितसर सुनावणी होईल. वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही,असा अर्ज केला आहे. तसेच मकोका कायद्यांतर्गत सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याची निकम यांनी सांगितलं. न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे असं सांगितलं.