सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातला एक मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी या दिवशी गुजरात मधील केवडिया येथे सायंकाळी 5.30 वाजता एकता नगरमध्ये 280 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6 वाजता ‘आरंभ 6.0’ अंतर्गत 99 व्या कॉमन फाऊंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.
त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.15 वाजता पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जाईल.
उद्योग आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे मिशन
एकता नगर येथे पंतप्रधान मोदी ज्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि पायाभरणी करतील, त्यांचा उद्देश पर्यटन उद्योगाला चालना देणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि संपूर्ण प्रदेशातील शाश्वत उपक्रमांना समर्थन देणे आहे.
स्वावलंबी, विकसित भारताचा रोडमॅप
पंतप्रधान ‘आरंभ 6.0’ अंतर्गत राष्ट्रीय एकता दिनाच्या पूर्वसंध्येला 99 व्या कॉमन फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम ‘आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी रोडमॅप’ आहे. ९९व्या कॉमन फाऊंडेशन कोर्स ‘आरंभ ६.०’ मध्ये भारताच्या १६ नागरी सेवा आणि भूतानच्या ३ नागरी सेवांमधील ६५३ अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.