---Advertisement---

Satish Wagh Case : नवा खुलासा; सुपारी होती फक्त अपंग करण्याची, पण…

---Advertisement---

Satish Wagh Case : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे.

सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हीनेच संपत्ती तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचे समोर होते. मात्र, आता या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे.

सतीश वाघ हत्या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशीतून एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

सतीश वाघ यांचे फक्त हात-पाय तोडून अपंग करण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र, मारेकऱ्यांना सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याचे समजल्यावर त्यांनी खून करण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.

चौकशीतून असे उघड झाले आहे की, सतीश वाघ हे आपल्या पत्नीला मारहाण करत होते आणि घर खर्चासाठी पैसे देत नव्हते. यामुळे पत्नी मोहिनी वाघ हिने हा निर्णय घेतला. तिच्या मते, नवऱ्याला अपंग केल्यास तो घरातच राहील आणि आर्थिक व्यवहार तिच्या ताब्यात येतील. या हेतूनेच तिने हात-पाय तोडण्याची सुपारी दिली होती.

सुपारी घेतलेल्या मारेकऱ्यांना वाघ यांची ओळख समजल्यावर प्रकरणाचे स्वरूप बदलले. परिणामी, हात-पाय तोडण्याऐवजी थेट त्यांचा खून करण्यात आला. मोहिनी वाघचा हा कट उघड झाल्याने पोलिस तपासात नवे वळण मिळाले आहे. पोलिस तपास अद्याप सुरू असून लवकरच या प्रकरणातील इतर तपशील उघड होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment