Satish Wagh Case : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे.
सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हीनेच संपत्ती तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, मोहिनी वाघ हिने आपल्या पतीवरच (सतीश वाघ) बाहेर अनैतिक संबंध असल्याचे आणि छळवणुकीचे आरोप केले आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. हा सर्व त्रास असह्य होता, असा धक्कादायक खुलासा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली त्यांची पत्नी मोहिनी हिने काल झालेल्या पोलिसांच्या चौकशीत केला आहे.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने मोहिनीसह सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम
कुटुंबाची पार्श्वभूमी : 2001 साली अक्षय जावळकर आणि त्याचे आई-वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहायला आले.
अक्षय आणि वाघ कुटुंबाची मैत्री : सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा आणि अक्षय यांचा वय तसा समान होता, त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री होती.
अनैतिक संबंधांची सुरूवात : 2013 मध्ये अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले.
अक्षयचे शिक्षण आणि लग्न : अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि 2016 मध्ये त्याचे लग्न झाले, तरीही मोहिनीशी त्याचे प्रेमसंबंध कायम राहिले.
सतीश वाघ यांचा वाद : सतीश वाघ यांना त्यांचा आणि मोहिनीच्या संबंधाचा संशय आला, ज्यामुळे वाद सुरू झाले.
हत्येचा कट : मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा कट रचला आणि अक्षयने त्याच्या मित्रांची मदत घेतली.
हत्या : 9 डिसेंबरला सतीश वाघ यांचा अपहरण करून, 70 वार करून हत्या करण्यात आली.
पोलिसांची तपासणी : पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयचे कॉल रेकॉर्ड तपासून हत्येचा खुलासा केला.